बहुउपयोगी रानमेवा - करवंद
बहुउपयोगी रानमेवा - करवंद डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. करवंद हा रानमेवा आरोग्यरक्षणासाठी सर्वानी आवर्जून खावा. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो. करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते. करवंदांची फळे मृदू व गोटीसारखी असून पिकल्यावर जांभळट काळी होतात., चवीला आंबट-गोड असतात. फळात बहुधा चार बिया असतात.. पिकलेली फळे शीतकारक व भूक वाढविण